आष्टा हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपालिका आहे. ते १६.९५°उत्तर ७४.४°पूर्व येथे स्थित आहे. त्याची सरासरी उंची ५६७ मीटर (१८६० फूट) आहे. "अष्ट" हे नाव, भगवान श्री राम यांनी या भागात आठ (अष्ट) भगवान महादेव मंदिरे स्थापन केली" या आख्यायिकेवरून आले आहे.
अपर आष्टा तहसिल मध्ये एकूण २१ महसुली गावे असून १ नगरपरिषद व २० ग्रामपंचायती समाविष्ट आहेत. एकूण ३ महसूली सर्कल असून १७ सजा समाविष्ट आहेत. एकूण शेतकरी खातेदार ४४,९१९ इतके आहेत. आष्टा तहसिल मध्ये एकूण ३५,५९३ सातबारा आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार आष्टा अपर तहसिलच्या अधिनस्त क्षेत्राची एकूण लोकसंख्या १,२३,५१२ इतकी आहे.